होमिओपॅथी ही अत्याधुनिक आणि शास्त्रशुद्ध उपचार पद्धती असून ती कमी खर्चाची व अहिंसक आहे. आपल्या देशात शासनाने होमिओपॅथीला अधिक प्रोत्साहन व सहकार्य दिलेच पाहिजे.
- राष्ट्रपिता महात्मा गांधी.
होमिओपॅथी म्हणजे काही औषधांचा संग्रह नसून संयुक्तीक तत्वज्ञानाचा पाया असलेले नवीन वैद्यकशास्त्र आहे. भारतीय परिस्थितीचा खास विचार करुन आम्हाला यामध्ये अधिक शास्त्रीय अभिरुचीने शोधकार्य केले पाहिजे.
- श्री.छत्रपती शाहू महाराज.
होमिओपॅथी ही वैदक शास्त्राचीच एक शाखा असून ती अत्यंत उपयुक्त व जीवनोपयोगी आहे. होमिओपॅथी या औषध पध्दतीचा प्रसार व औषधांचा वापर महाराष्ट्रात अलिकडे खूप वाढला आहे. विशेषतः सुशिक्षित, गरीब व मध्यम वर्गातील कुटुंबातून होमिओपॅथी औषधांची लोकप्रियता वाढली आहे. इतर वैद्यक पद्धतीचे चिकित्सक व शल्यशास्त्र चिकित्सही होमिओपॅथी औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. होमिओपॅथीची ही लोकप्रियता विशेष जाहिरात व गाजावाजा न करता तिच्या शाश्वत सिध्दांत व अंगच्या गुणामुळे वाढत आहे. तरीही होमिओपॅथीक डॉक्टरांच्याकडे येणाऱ्या बऱ्याच रुग्णांमध्ये, आम्ही ठराविक रोगांवरच औषध देत असतो, असा गैरसमज आहे.
होमिओपॅथी हे शास्त्र काय आहे ?
होमिओपॅथीमध्ये कोणकोणत्या रोगांवर औषधे असतात ?
होमिओपॅथीक औषधांचे काही दुष्परिणाम (साईड इफेक्टस्) असतात काय ?
होमिओपॅथीक औषधांमुळे सर्व साधारणपणे आजार किती दिवसात बरे होतात ?
या साऱ्या प्रश्नांची उत्तरे अशी की, होमिओपॅथी हे शास्त्रीय दृष्ट्या परिपूर्ण असे वैद्यकशास्त्र आहे. गेल्या दोन शतकापासून होमिओपॅथीकचा वापर सर्व जगभर होत आहे. डॉ. सॅम्युएल हॅनिमन या जर्मन डॉक्टरांनी १७९६ मध्ये होमिओपॅथीचा शोध लावला. होमिओपॅथी औषधे प्रथम निरोगी मनुष्यावर प्रयोग (ड्रग प्रुव्हींग) करुन सिध्द केलेली असतात. मनुष्यावर प्रयोग केल्यामुळे ह्या औषधांचे रुग्णांवर दुष्परिणाम (साईड इफेक्टस्) होत नाहीत. हा सर्वात मोठा व महत्वाचा होमिओपॅथी व इतर वैदक शाखामधील फरक आहे. याच कारणामुळे होमिओपॅथीमध्ये उपचार करीत असताना रुग्णाच्या सवयी, आवडी- निवडी, स्वभाव, मनाच्या भावना या विचारात घेतल्या जातात. होमिओपॅथीकमध्ये रुग्णाची सर्व मानसिक व शारीरीक लक्षणे विचारात घेऊन, नंतरच अचूक औषधांची निवड केली जाते.
होमिओपॅथीक औषधे मुख्यतः द्रव आणि घन स्वरुपात तयार केलेली असतात. परंतु ती रुग्णांच्या सोयीकरिता गोळ्यांमध्ये मिसळून दिली जातात. होमिओपॅथीक औषधांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व गोळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात. पण त्यांचा आकार लहान-मोठा असू शकतो. सर्व गोळ्यांचा रंग जरी पांढरा असला तरी त्यामध्ये मिसळलेली द्रवरुप औषधे ही ज्या त्या रोगांवर अवलंबून अचूक निवडलेली आणि वेगवेगळी असतात.
होमिओपॅथी हे अत्यंत परिपूर्ण व प्रगत वैद्यकशास्त्र असलेने यामध्ये सर्व प्रकारच्या आजारांवर औषधे उपलब्ध आहेत. तरीसुध्दा खालील काही रोगांवर ही होमिओपॅथीक औषधे उपयोगी ठरतात.
खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हॉटस ॲप ग्रुप जॉईन करा
आजारा विषयी माहिती
पोटाचे विकार
अपचन, गॅसेस, अल्सर, पित्ताचे विकार, आव पडणे, शौचास साफ न होणे, पित्ताशयातील खडे, लिव्हर व तत्संबंधीत आजार इत्यादी.
मूळव्याध
मूळव्याधीवर होमिओपॅथीमध्ये अत्यंत गुणकारी औषधे आहेत व हा आजार शस्त्रक्रियेविणा पूर्णपणे बरा होतो हे असंख्य रुग्णांना अनुभवास आले आहे. त्याचप्रमाणे फिशर (परावर्तीका) व भगेंद्र सुध्दा याने बरे होतात.
हृदयविकार, दमा, रक्तदाब, मधुमेह, डोकेदुखी, अर्धशीशी, अॅसिडीटी, अल्सर, पोटातील जळजळ, पोट साफ न होणे, अपचन, गॅसेस, फेफरे, अतीलठ्ठपणा, अतिबारीकपणा, स्नायू दुखणे, शारीरिक थकवा व वेदना, झोपेची तक्रार, मुरूम, त्वचारोग, इसब, सांधेदुखी, दाढदुखी, केस गळणे, पांढरे होणे, केसातील कोंडा, उंची वाढविणे (लहान मुलांची) इ.
सर्व प्रकारच्या लैंगिक समस्या, लैंगिक इच्छा कमी असणे, लैंगिक सुख न मिळणे, लैंगिक थंडपणा, अतिकामवासना, सेक्सची भीती, जोडीदाराविषयी नावड, लिंगताठरता, वेळे आधी रस्खलन, विलंबीत वीर्यपतन, हस्त मैथुनाची सवय, धातू जाणे, सवयीचा गर्भपात, प्रसुती वेदना, मासिक पाळीच्या तक्रारी, सुलभ प्रसुतीसाठी, गर्भ संस्कार इ.
अंगठा चोखणे, नखे कुरतडणे, लैंगिक चाळे करणे, अंथरुण ओले करणे, खाण्यापिण्याच्या तक्रारी, हट्टी स्वभाव, खोटे बोलणे, चोरी करणे, भांडणे, भावंडाचा द्वेष करणे, घरातून पळून जाणे, अति लाजणे, बोबडे बोलणे, सतत बडबडणे, एकलकोंडा, अतिखाणे, विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूची भीती, झोपेत चालणे, झोपेत बडबडणे, उशीरा झोपणे किंवा उठणे इत्यादी.
५) शैक्षणिक प्रगती
अभ्यासाचा कंटाळा घालवणे, अभ्यासात गोडी निर्माण करणे, विशिष्ट शिक्षक किंवा विषयाची भीती घालविणे, परीक्षेची भीती घालविणे, हस्ताक्षर सुधारणे, वाचनाचा वेग वाढविणे, अभ्यासातील एकाग्रता वाढविणे, स्मरणशक्ती वाढविणे, क्रियेटीव्ह विचार करण्याची कुवत वाढविणे, मनन, चिंतन, स्मरण यामध्ये प्रगती साधने, नियोजनबद्ध अभ्यास करणे, जिद्द आणि चिकाटी वाढविणे
६) व्यक्तीमत्व विकास
वक्तृत्व कला, संभाषण कला, गायन कला, लेखन कौशल्य, क्रिडाकौशल्य, संघटन कौशल्य, नेतृत्व गुण, विनोदीबुद्धी, आत्मविश्वास, नवचैतन्य, सृजनशीलता, सक्रीयता, जीवंतपणा, महत्वाकांक्षी, ध्येयवादी, आशावादी, चाणाक्षपणा, बोलकेपणा इ. वाढविणे.
अतिंद्रीय शक्ती, कुंडलिनी जागृती भविष्य ज्ञान, स्वतःच्या समस्येचे स्वतःच निराकरण करणे, अंतर्मनाचे सतत मार्गदर्शन मिळवणे, त्वरीत ध्यानावस्थेत जाणे.नशीब हवे तसे बनविणे, इच्छित उद्दीष्ट प्राप्त करून घेणे, आजूबाजूची परिस्थिती मनासारखी बनविणे, आध्यात्मिक साधनेत जलद प्रगती, शरीरांतर्गत व्याधी ओळखणे, आनंद, सुख-शांती समाधान मिळवणे इ.
नार्को टेस्ट, हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेणे, खरे खोटे गुन्हेगाराचा पडताळा करणे, केलेल्या गुन्ह्याची माहिती करुन घेणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे, खून, दरोडे, आत्महत्या इत्यादी वाईट कृत्यापासून दूर करणे.
या सर्व आजारा बरोबरच दारु व तंबाखू सोडविण्यासाठी, अकाली केस गळणे, केस पिकणे, वजन कमी करणे व वाढविणे, दात किडणे व ठिसूळ होणे, हिरड्यातून रक्त इत्यादी सर्वच रोगांवर होमिओपॅथीक औषधाने उत्तम इलाज केले जातात.
होमिओपॅथीक औषधे कितीही कालावधीसाठी घेतली तरी त्याचे काहीही दुष्परिणाम (साईड इफेक्टस्) होत नाहीत. होमिओपॅथीक औषधांमुळे आजार किती दिवसात बरे होतात हे सर्व ज्या त्या रोगांवर, रोगाचा कालावधी, तीव्रता व संबंधीत रुग्णांवर अवलंबून असते. रुग्ण आपल्या तक्रारीसाठी लवकर डॉक्टरांच्याकडे आला तर त्यांच्या आजार लवकर बरा होण्यास मदत होते व त्याहूनही महत्वाचे म्हणजे होमिओपॅथीक औषधाने एकदा बरा झालेला आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता फारच कमी असते.